ये वो सहर तो नहीं…

अनेकदा मला विचारण्यात येते की मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम का केले नाही. अमिताभ बच्चन हे शतकातील सर्वांत मोठे अभिनेते आहेत, असं मी मानतो, पण त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला का मिळाली नाही, हे मी सांगू शकत नाही. त्याचं उत्तरही माझ्याकडे नाही, पण तो माझा आवडता अभिनेता नाही. खरं तर प्रत्यक्षात माझ्याबरोबर जे चित्रपट करतात ते वेगळे कलाकार आहेत. ‘शोले’ या सिनेमालासुद्धा मी चांगला मानत नाही. अनेक लोक माझ्याशी सहमत नाहीत, हे मला माहिती आहे. तू स्वतःला काय समजतो? असं मुंबईतले लोक मला म्हणतात. पण मी ‘मुघल-ए-आझम’, ‘रुस्तुम-ए-रोम’ यांना उत्तम चित्रपट मानतो. ‘शोले’मध्ये एकही असं दृश्य नाही, ज्यामुळे मला आनंद होतो. ‘प्यासा’ मला खूप आवडतो. ‘कागज के फूल’ मला नाही आवडला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही कोणताही चित्रपट कन्व्हिसिंगली करू शकलो नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart