ग्वाल्हेर शहरात अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. ग्वाल्हेरला ऐतिहासिक महत्त्व मिळवून दिलं महादजी शिंदे यांनी. मराठी प्रांतातून उत्तरेत येऊन शिंदे यांनी इतिहास घडवला. आजही शिंदे घराण्याचा ग्वाल्हेरवरच काय पूर्ण मध्य भारतावर प्रभाव आहे.
ग्वाल्हेर शहराच्या मध्यभागी महाराज वाडा नावाची जागा आहे. या वाड्यावर सात विभिन्न शैलींनी बनलेल्या अद्भुत ऐतिहासिक इमारती आहेत. वाड्याच्या मध्ये जिवाजीराव शिंदे महाराजांची छत्री आहे. छत्री म्हणजे स्मारक. या छत्रीमध्ये जिवाजीराव शिंदे यांची अष्टधातूने बनवलेली प्रतिमा स्थापित केली आहे. या प्रतिमेच्या खाली त्यांची रक्षा ठेवलेली आहे. त्याच्या चारी बाजूला ब्रिटिश शैलीचे उद्यान आहे. याच्या दोन्ही बाजूंना हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेले शिलालेख आहेत.
