विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक आरोग्याच्या समस्यांविषयी सर्वसामान्यांमध्ये असणारी जागरूकता आता वाढते आहे. या समस्यांविषयीचे वैद्यकीय विश्लेषण, त्यांच्या कारणांचा शोध आणि उपचारपद्धती याबद्दलही पूर्वीच्या तुलनेत मोकळेपणाने चर्चा होऊ लागली आहे. मात्र जनुकीय कारणांमुळे उद्भवणारे आजार, त्यामागील कारणे, समुपदेशन आणि उपचार याबद्दल आजही समाजामध्ये आवश्यक ती जागरूकता निर्माण झालेली नाही. मुळात शारीरिक अनारोग्याचे प्रश्न जनुकीय कारणांमुळे निर्माण होतात, याचीच अनेकांना कल्पना नसते. याबाबत जाणीवजागृती करण्यासाठी मुंबईतील परळ येथील ‘जनुकीय संशोधन केंद्र, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टीव्ह अँड चाइल्ड हेल्थ’ येथे विनाशुल्क चाचण्या, समुपदेशनाची सेवा देण्यात येते.
